AIMA MAT Result 2021: मॅट परीक्षेचा निकाल जाहीर

AIMA MAT Result 2021: मॅट परीक्षेचा निकाल जाहीर

MAT निकाल 2021: (AIMA)ने डिसेंबरमध्ये झालेल्या MAT परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार AIMA MAT च्या अधिकृत वेबसाइट mat.aima.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. विद्यार्थी त्यांचा MAT रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक टाकून डिसेंबर सत्रासाठी AIMA MAT निकाल 2021 पाहू शकतात. MAT डिसेंबर 2021 स्कोअरकार्ड एक वर्षासाठी वैध आहे आणि उमेदवारांना MAT स्कोअरकार्ड 2021 ची कोणतीही हार्ड कॉपी मिळणार नाही, हे ध्यानात घ्यावे. MAT निकाल 2021 कसा तपासायचा? - AIMA MAT ची अधिकृत वेबसाइट mat.aima.in ला भेट द्या. - होमपेजवर डाऊनलोड/व्ह्यू टॅबवर क्लिक करा. - ड्रॉपडाउन मेनूमधून, MAT Result टॅबवर क्लिक करा. - उमेदवारांसाठी एक नवीन पेज उघडेल. - विचारलेली माहिती भरा आणि सबमिट करा. - डिसेंबरसाठी MAT स्कोअरकार्डवर क्लिक करा. - स्क्रीनवर MAT स्कोअरकार्ड 2021 दिसेल. तुम्ही तुमचा निकाल मोबाईल एसएमएसद्वारे पाहू शकता (मोबाईलद्वारे निकाल तपासा) MAT निकाल 2021 उमेदवारांना SMS द्वारे देखील उपलब्ध आहे. एसएमएसद्वारे स्कोअर पाहण्यासाठी, MAT अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आदि माहिती भरून ५४२४२ या क्रमांकावर एसएमएस पाठवा. निकाल तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल. स्कोअर कार्ड नीट तपासून घ्या, काही चूक आढळल्यास, matibt@aima.in वर संपर्क साधता येईल. MAT स्कोअर आणि पर्सेंटाइल तपासल्यानंतर, तुम्ही आता पसंतीच्या व्यवस्थापन संस्थेत अर्ज करू शकता.


source https://maharashtratimes.com/career/career-news/aima-mat-december-session-result-2021-declared-download-score-at-mat-aima-in/articleshow/88618428.cms

0 Response to "AIMA MAT Result 2021: मॅट परीक्षेचा निकाल जाहीर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel