TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

गरजू विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात; दीड कोटींचे अर्थसहाय्य

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात शिकत असणाऱ्या गरजू, आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ाने मदतीचा हात पुढे करत रुपये १ कोटी ५७ लाख ८२ हजारांचे अर्थसहाय्य केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध चार योजनांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यामध्ये पुस्तकपेढी योजनेअंतर्गत ७१ लाख ५१ हजार रुपये, आर्थिकदृष्ट्या गरजू आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ३ लाख १७ हजार ५८० रुपये, महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८ लाख ८१ हजार ५०० रुपये, तर विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागात शिकत असणाऱ्या एस.सी./ एस.टी./ डी.टी./ एन.टी. विद्यार्थ्यांना २४ लाख ३२ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात शिकत असणाऱ्या गरजू, आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांअतर्गत योजना राबविल्या जातात. पुस्तक पेढी योजनेअंतर्गत महाविद्यालयातील २४ हजार ६०४ आणि शैक्षणिक विभागातील ८९ विद्यार्थ्यांसाठी ७१ लाख ५१ हजार रुपये वितरीत करण्यात आले आहेत. आर्थिकदृष्ट्या गरजू आणि मागासवर्गीय विद्यार्थी योजनेअंतर्गत महाविद्यालयातील १७६ आणि शैक्षणिक विभागातील २५ विद्यार्थ्यांसाठी ३ लाख १७ हजार ५८० रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तिसऱ्या योजनेअंतर्गत महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसुचित जमातीच्या ७२२ विद्यार्थ्यांसाठी ५८ लाख ८१ हजार ५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. तर चौथ्या योजनेअंतर्गत विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागात शिकणाऱ्या ७६ एस.सी./ एस.टी./ डी.टी./ एन.टी. विद्यार्थ्यांना २४ लाख ३२ हजार रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. या चारही योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत स्वतंत्र संकेतस्थळ तयार करून संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. कल्याणकारी योजना राबविण्यासाठी विद्यापीठ सतत प्रयत्नशील सर्वसमावेशकता या तत्वाचा अवलंब करत मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या गरजू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी विद्यापीठाने राबविलेला हा अत्यंत्य स्तूत्य उपक्रम आहे. विद्यापीठाने नेहमीच गरजवंतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी विद्यापीठ सतत प्रयत्नशील राहणार आहे. - प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ अर्थसंकल्पात या योजनांसाठी अधिकची वाढीव तरतूद मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या चारही योजनांसाठी विद्यापीठाने भरीव आर्थिक तरतूद केली आहे. अधिकाधीक गरजू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी बृहत आराखड्यानुसार प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनांसाठी अधिकची वाढीव तरतूद करण्यात येत आहे. प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ


source https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-financial-assistance-of-rs-1-5-crore-to-economically-weaker-and-backward-class-students/articleshow/88618646.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या