Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-12-16T09:01:02Z
Rojgar

BMC मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती, दहावी-बारावी उत्तीर्ण असाल तर आजच करा अर्ज

Advertisement
BMC Recruitment 2021: मुंबई महानगर पालिकेमध्ये () दहावी, बारावी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. पालिकेतर्फे डेटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती करण्यात येणार आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदासाठी ऑफलान माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या एकूण १५ जागा भरल्या जाणार आहेत. कंत्राटी पद्धतीने १ वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती होणार आहे. १ जानेवारी २०२२ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी ही भरती असेल. यानंतर मुदतवाढ देण्याचा अधिकार पालिकेकडे असेल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षेमध्ये मराठी विषय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवाराला कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. इंग्रजी आणि मराठी टायपिंगचा प्रत्येकी किमान ३० शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक आहे. एमएससीआयटी (MSCIT) असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराला एसएमआयएस (HMIS) सिस्टिमवरील कामाचा अनुभव असल्यास नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. वयोमर्यादा उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे या दरम्यान असावे. पगार डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५ हजार रुपये पगार दिला जाईल. या व्यतिरिक्त कोणताही इतर भत्ता दिला जाणार नाही. उमेदवारांनी अर्जासोबत रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. कागदपत्र पडताळणीदरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. अर्ज प्रक्रिया उमेदवारांकडून आलेल्या अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानंतर उमदेवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. यातून निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच ईमेलद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी आपला अर्ज बा. ए.एल. नायर धर्म हॉस्पिटल, डॉ. ए.एल. नारायण रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- ४०० ०८ या पत्त्यावर पाठवायचा आहे. २२ डिसेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/bmc-recruitment-2021-data-entry-operator-post-vacant-in-mumbai-municipal-corporation-apply-for-bmc-job/articleshow/88314151.cms