Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-12-03T11:43:54Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE Term 1 Exam: विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवता येणार Rojgar News

Advertisement
CBSE: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) टर्म 1 बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. दरम्यान, सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांबाबत सीबीएसई बोर्डाने महत्वाचे निर्देश जाहीर केले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या परिपत्रकानुसार, टर्म १ परीक्षेची उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका आणि ओएमआर शीटच्या मूल्यांकनाबाबत आवश्यक माहिती देण्यात आली आहे. बोर्डाची अधिकृत वेबसाइट .gov.in वर संबंधित परिपत्रक पाहता येणार आहेत. सीबीएसईच्या परीपत्रकानुसार दहावी आणि बारावी टर्म १ बोर्डाच्या परीक्षा बदललेल्या नियमांद्वारे घेतल्या जात आहेत. परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात असून विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरे ओएमआर शीटवर भरायची आहेत. परीक्षा संपल्यानंतर त्याच दिवशी या ओएमआर गुणपत्रिकांचे मूल्यमापनही केले जात आहे. हे मूल्यमापन सीबीएसईने जाहीर केलेल्या उत्तरतालिकेच्या आधारे केले जात आहे. असे असले तरीही प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिकेमध्ये दिलेल्या उत्तरात काही चूक होण्याची शक्यता असते. मात्र या चुका सुधारण्यासाठी देखील बोर्डाने यंत्रणा तयार केली आहे. अशी करा दुरुस्ती सीबीएसईने नवीन परिपत्रकात दिलेल्या माहिती कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात किंवा उत्तर-कीच्या उत्तरात काही चूक असल्यास, परीक्षा संपल्यानंतर लगेच बोर्डाला कळवा. विषयातील तज्ञांनी तपासलेल्या प्रश्नपत्रिका (CBSE Term 1 Question Paper) किंवा उत्तरतालिका (CBSE Term 1 AnswerKey) वर नोंदवलेले आक्षेप बोर्डाला कळू शकतील. यानंतर त्वरीत चुका सुधारल्या जातील आणि त्यानंतर निकाल तयार होईल. प्रश्नपत्रिकेत काही चूक असल्यास किंवा कोणतेही उत्तर चुकीचे दिले असल्यास विद्यार्थी त्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या आवडीनुसार उत्तर देऊ शकतात. पेपर तपासणीस त्यांना मिळालेल्या उत्तरतालिकेनुसार ओएमआर शीट तपासतील. या तपासणीवेळी चूक सिद्ध झाल्यास, त्या प्रश्न किंवा उत्तरासाठी विद्यार्थ्यांना गुण दिले जातील. ही माहिती सर्व शाळा आणि केंद्रांवर विद्यार्थ्यांना देण्यात यावी, असे निर्देश सीबीएसई बोर्डाने दिले आहेत. सीबीएसई परीक्षेच्या दिवशीच ओएमआर शीट तपासली जात आहे. सीबीएसई टर्म १ परीक्षेचा निकाल कमी वेळेत जाहीर होणार आहे. टर्म १ परीक्षेचा निकाल डिसेंबर २०२१ मध्येच जाहीर केले जातील अशी अपेक्षा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IfKyu2
Source https://ift.tt/310mqee