
MU 2021 मुंबई विद्यापीठाच्या पेट (Phd Entrance Test पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. शुक्रवार १७ आणि शनिवार १८ डिसेंबर २०२१ रोजी विद्याशाखानिहाय आणि विषयनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. यानुसार मानव्यविद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखेच्या परीक्षा १७ डिसेंबर रोजी तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा १८ डिसेंबर रोजी आयोजित केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ९ ते १५ डिसेंबर दरम्यान सराव (मॉक) परीक्षांचेही आयोजनही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. पेट परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण ४,४९९ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २,६५४ एवढ्या मुलींनी तर १,८४५ एवढ्या मुलांनी अर्ज केले आहेत. विद्याशाखानिहाय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधिक १,९२१ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यानंतर मानव्यविद्याशाखेसाठी १,१३२, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ७४५ आणि आंतरविद्याशाखेसाठी ७०१ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूण ७९ विषयांसाठी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक ४६९ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापाठोपाठ इंग्रजी या विषयासाठी २२५ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZQNg7P
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या