Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २७ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-12-27T14:00:22Z
Rojgar

CLAT 2022: क्लॅट परीक्षेसाठी अर्जप्रक्रियेला सुरूवात

Advertisement
CLAT Registration 2022: नॅशनल लॉ यूनिवर्सिटीज ()च्या कंसोर्टियमने कॉमन लॉ एडमिशन टेस्ट (CLAT) २०२२ साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. क्लॅट २०२२ परीक्षेसाठी रजिस्‍ट्रेशन प्रक्रिया १ जानेवारी, २०२२ पासून सुरू होणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज ऑनलाइन डाऊनलोड करू शकतात. अर्ज प्रक्रिया जमा करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च २०२२ आहे. ची परीक्षा ८ मे २०२२ रोजी होणार आहे. परीक्षा दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल. ही एक राष्ट्रीय स्तरावरील विधी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा आहे. २२ राष्ट्रीय विधी विद्यापीठांमधील पाच वर्षीय एलएलबी आणि एक वर्षीय एलएलएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात येते. ही परीक्षा ऑफलाइन असेल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्र तयार केले जातील. परीक्षेसाठी पात्रताउमेदवारांनी किमान ४५ टक्के गुणांसह (एससी / एसटी उमेदवारांसाठी ४० टक्के गुण) बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मार्च / एप्रिल २०२२ मधील परीक्षा देणारे उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांकडे किमान ५० टक्के गुणांसह (एससी / एसटी उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण) एलएलबीची पदवी आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे उमेदवारही ही परीक्षा देऊ शकतात. अर्ज शुल्क CLAT 2022 साठी अर्ज भरताना उमेदवारांनी ऑनलाइन पेमेंट गेटवेचा उपयोग करायचा आहे. याद्वारे अर्ज शुल्क जमा करता येईल. सर्वसाधारण गटातील उमेदवारांसीठी CLAT अर्जाचे शुल्क चार हजार रुपये आहे. एससी, एसटी आणि बीपीएल उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३,५०० रुपये आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/clat-registration-2022-will-begin-from-january-1-nlus-has-released-notification/articleshow/88524823.cms