Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-12-03T07:43:11Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CSAB Counselling 2021: सीएसएबी स्पेशल राऊंड १ जागा वाटपाचा निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
Counselling 2021: सेंट्रल सीट अलोकेशन बोर्ड ( Board, CSAB) तर्फे इंजिनीअरिंग प्रवेशासाठी स्पेशल राऊंड १ काऊन्सेलिंगचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. CSAB स्पेशल राउंड १ जागा वाटप निकालाची लिंक बोर्डाची अधिकृत वेबसाइट csab.nic.in वर सक्रिय करण्यात आली आहे. CSAB काऊन्सेलिंग २०२१ साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहता येणार आहे. CSAB २०२१ च्या जागा वाटप निकालाची थेट लिंक या बातमीखाली देण्यात आली आहे. काऊन्सेलिंग वेळापत्रक २०२१ नुसार, नोंदणी आणि पर्याय/चॉइस फिलिंगची प्रक्रिया २ ते ४ डिसेंबर २०२१ दरम्यान पूर्ण करायची आहे. ५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जाणार आहेत. CSAB Result 2021: या स्टेप्स फॉलो करा CSAB अधिकृत वेबसाइट csab.nic.in वर जा. होमपेजवर खाली स्क्रोल केल्यावर CSAB स्पेशल राउंड १ जागा वाटप निकालाची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. CSAB 2021 रिझल्ट पेज खुले होईल. तुमचा जेईई मुख्य अर्ज क्रमांक येथे भरा. त्यानंतर पासवर्ड टाका. जर तुम्ही जोसा (JoSAA) काऊन्सेलिंग २०२१ साठी नोंदणी केली असेल, तर JoSAA 2021 चा पासवर्ड भरा. किंवा जेईई मेन २०२१ चा पासवर्ड भरा. त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा सिक्युरिटी पिन टाका आणि लॉगिन बटणावर क्लिक करा. लॉगिन केल्यानंतर सीट अलॉकेशनचा निकाल स्क्रीनवर दिसेल. येथून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. विद्यार्थ्यांनी हा निकाल कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोनमध्ये सेव्ह करावा. तसेच त्याची प्रिंट आऊट काढून जपून ठेवावी. प्रवेश प्रक्रियेत त्याची आवश्यकता असू शकते. CSAB विशेष फेरीचे काऊन्सेलिंग जेईई मेन रँकच्या आधारे केले जाते. याद्वारे, इंजिनीअरिंग यूजी (बीई / बीटेक / आर्किटेक्चर / प्लॅनिंग) प्रवेश एनआयटी (एनआयटी प्रवेश २०२१), ट्रिपल आयटी (IIIT प्रवेश), आयआयइएसटी (IIEST प्रवेश) आणि इतर सरकारी अनुदानित टेक्निकल संस्था (GFTI) मध्ये उपलब्ध आहेत. JoSAA काऊन्सेलिंगनंतर, या संस्थांमधील रिक्त जागांवर CSAB विशेष फेरीद्वारे प्रवेश दिला जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rtaDzT
Source https://ift.tt/310mqee