IIT Placement 2021: आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कोट्यवधींच्या जॉब ऑफर्स Rojgar News

IIT Placement 2021: आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कोट्यवधींच्या जॉब ऑफर्स Rojgar News

देशातील विविध भारतीय प्रौद्योगिकी संस्था म्हणजेच आयआयटींमध्ये ( Placements)‘प्लेसमेंट' कार्यक्रम सुरू झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना एक कोटींहून अधिक रुपयांच्या वेतनाचे वार्षिक पॅकेज मिळत आहेत. अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की ही कोविडच्या आधीच्या काळापेक्षाही चांगली कामगिरी आहे. आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याला उबर कंपनीने सुमारे २.०५ कोटी रुपयांच्या पॅकेजचा प्रस्ताव दिला आहे. इतरही आयआयटींमधील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये अशा कोट्यवधींच्या ऑफर्समुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आयआयटी दिल्लीत किमान ६० विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. आयआयटी रूरकीच्या एका विद्यार्थ्याला तंत्र क्षेत्रात काम करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीने चक्क २.१५ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला दोन कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. वाराणसी येथील आयआयटी (BHU)च्या पाच विद्यार्थ्यांना उबरने नोकरीचा प्रस्ताव दिला. या पाचपैकी एका विद्यार्थ्याला अमेरिका स्थित कंपनीच्या कार्यालयातून काम करण्याचा प्रस्ताव मिळाला, तर अन्य एकाला दोन कोटी रुपयांच्या वार्षिक पॅकेजची ऑफर आली. एकूण ५५ कंपन्यांनी आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थ्यांना २३२ ऑफर लेटर दिले, यांमध्ये सरासरी ३२.८९ लाख रुपये आणि किमान १२ लाख रुपयांच्या वार्षिक वेतनाच्या पॅकेजचा समावेश आहे. आयआयटी मद्रासने सांगितले की पहिल्या दिवशीच मागील वर्षीच्या तुलनेत ४३ टक्के अधिक प्रस्ताव आले आहेत. आयआयटी मार्केटमध्ये सरासरी वार्षिक वेतनात १६ टक्के वाढ झाली आहे. आयआयटी मद्रासच्या पहिल्या दिवशी ३४ कंपन्यांनी १७ पॅकेज ऑफर केले. पहिल्या दिवशी येणाऱ्या ऑफर्सची ही सर्वाधिक संख्या आहे. आयआयटी मद्रासने अशीही माहिती दिली की ११ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ऑफर्स आल्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rxZmym
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "IIT Placement 2021: आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कोट्यवधींच्या जॉब ऑफर्स Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel