Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २० डिसेंबर, २०२१, डिसेंबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-12-20T13:00:18Z
Rojgar

CSIF Recruitment: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती, जाणून घ्या तपशील

Advertisement
CSIF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (, CSIF) मध्ये कॉन्स्टेबल भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत (CISF) ने हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सीआयएसएफने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, विविध खेळांच्या क्रीडा कोट्याअंतर्गत भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरती अंतर्गत एकूण २४९ पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार सीएसआयएफची अधिकृत वेबसाइट cisfrectt.in वरील भरती पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे.ईशान्य विभागातील उमेदवारांसाठी अंतिम तारीख ७ एप्रिल २०२२ आहे. कोण अर्ज करू शकतो? सीएसआयएफ द्वारे प्रसिद्ध केलेल्या स्पोर्ट्स कोटा हेड कॉन्स्टेबल भरती जाहिरातीनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारांनी १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान आयोजित राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला असावा. उमेदवारांचे वय १ ऑगस्ट २०२१ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आणि २३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. याचा अर्थ उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९८ पूर्वी झालेला नसावा आणि १ ऑगस्ट २००३ नंतर झालेला नसावा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. भरती जाहिरातीमध्ये याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. निवड प्रक्रिया सीआयएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या निवडीसाठी निवड प्रक्रिया देण्यात आली आहे. यामध्ये फिजिकल टेस्ट, डॉक्युमेंटेशन यांचा समावेश असेल. प्रत्येक टप्पा पार पडल्यानंतर, मागील टप्प्याच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात उपस्थित राहण्यासाठी प्रवेशपत्रे दिली जातील.


source https://maharashtratimes.com/career/career-news/central-industrial-security-force-has-recruited-249-head-constable-apply-through-this-application-form/articleshow/88391564.cms