Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-12-16T14:01:02Z
Rojgar

CTET Exam Cancelled: तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील काही केंद्रांवर सीटीईटी रद्द

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत ( ) दुसऱ्या सत्रातील दुपारचा पेपर अनेक केंद्रावर रद्द करण्यात आला. त्यामुळे अनेक केंद्राबाहेर विद्यार्थी उभे होते. तांत्रिक अडचणीचे कारण परीक्षा रद्द झाल्याचे सांगण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पहिल्यांदाच ऑनलाइन होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. राज्यात सुमारे २१२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा रद्द झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व्हरसंबंधी अडचणी येत असल्यामुळे पेपर रद्द करण्यात आला. पेपर रद्द झाला तो केव्हा होईल याबाबतचे वेळापत्रक वेबसाईटद्वारे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. टीसीएस कंपनी ही परीक्षा घेत आहे. सीबीएसईतर्फे सीटीईटी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. पहिला पेपर सकाळी ९.३० वाजेपासून सुरू झाला. पहिला पेपर सुरळीत पार पडला. दुपारच्या सत्रातील पेपर २.३० वाजता सुरू होणार होता. विद्यार्थी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर पोहचले. ऑनलाइन लॉगीनही झाले परंतु पेपरच ओपन होत नसल्याचे समोर आले. तास दीड तास विद्यार्थी खोळंबले परंतु पेपर ओपन झाला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर आजचा पेपर रद्द झाल्याचे केंद्रावरून सांगण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत असून १३ जानेवारीपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहे. पेपर रद्द झाल्याचे कळाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. परीक्षेसाठी बहुतांशी खासगी संस्थांमध्ये सेंटर देण्यात आले. अशा केंद्राबाहेर विद्यार्थी ताटकळत उभे होते. पहिला पेपर हा प्राथमिकस्तरावरील तर दुसरा बीएडच्या विद्यार्थ्यांसाठीचा होता. याबाबत माहिती देताना परीक्षार्थी शुभम खोचरे म्हणाला परीक्षा हॉलमध्ये आम्ही लॉगीन केल्यानंतर पेपर ओपन होत नव्हता. काही वेळ प्रतीक्षा केली त्यानंतर पेपर रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्यात अनेक केंद्रावर हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. विद्यार्थी इतक्या अडचणीच्या काळात सुद्धा परीक्षेसाठी बाहेरून गावावरून आलेले आहेत एसटी बंद असल्यामुळे दुप्पट भाडे देऊन विद्यार्थी परीक्षेला वेळेवर हजर झाले आहेत पण काही कारणास्तव दुसऱ्या सत्रातली परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. दरम्यान, पहिल्या सत्रातील परीक्षा योग्य प्रकारे पार पडली.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ctet-exam-cancelled-at-some-centers-due-to-technical-glitch/articleshow/88319816.cms