
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (IDOL Admissin 2021) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या सत्रातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार या अंतिम फेरीत विद्यार्थ्यांना १० डिसेंबर २०२१ पर्यंत प्रवेशाचे अर्ज भरता येतील. तसेच यूजीसीने आयडॉलच्या आणखी तीन अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे. यूजीसीची तीन अभ्यासक्रमास मान्यता यूजीसीने यापूर्वी आयडॉलच्या १७ अभ्यासक्रमाला मान्यता दिली होती. बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स, एमएस्सी गणित व एमएस्सी आयटी या आणखी तीन अभ्यासक्रमास युजीसीने मान्यता दिली आहे.यामुळे यावर्षी आयडॉलच्या २० अभ्यासक्रमास युजीसीने मान्यता दिली आहे. यातील बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स या नव्या अभ्यासक्रमास यूजीसीने प्रथमच मान्यता दिली आहे. या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती असते. हा अभ्यासक्रम प्रथमच सत्र पद्धतीत दूरस्थ माध्यमातून चालविला जाणार आहे. प्रवेश शुल्कात २० ते ३५% सवलत या शैक्षणिक वर्षात कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाने अभ्यासक्रमाच्या प्रवेश शुल्कात २० ते ३५% सवलत दिली आहे. यामुळे विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश शुल्कात आयडॉलने कमीत कमी ८६० व जास्तीत जास्त ४५२० रुपयापर्यंत सवलत दिली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रवेश शुल्कात सवलत दिल्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला वर्ष २०२१-२२ या जुलै सत्रासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ऑक्टोबर २०२१ रोजी मान्यता दिली. यानुसार आयडॉलमध्ये जुलै सत्रात आजपर्यंत ५३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आयडॉलने प्रथम व व्दितीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व प्रथम वर्ष बीएस्सी कॉम्पुटर सायन्स हे पदवीस्तरावरील अभ्यासक्रम व एमए, एम.कॉम, एमए शिक्षणशास्त्र, एमए भूगोल, एमएस्सी गणित, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स, एमएस्सी आयटी, एमसीए हे अभ्यासक्रम व व्यवस्थापनाचा पीजी डीएफएम हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सत्र पद्धतीमध्ये चॉईसबेस क्रेडिट सिस्टीम (CBCS ) मध्ये सुरू केला आहे. ही मुदतवाढ बीए, बी.कॉम, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्पुटर सायन्स, एमए (मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र,राज्यशास्त्र ), एमए शिक्षणशास्त्र , एमए भूगोल, एम.कॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्प्युटर सायन्स व व्यवस्थापनाचा पीजी डीएफएम या अभ्यासक्रमासाठी झाली आहे. जुलै सत्रासाठी हि अंतिम मुदतवाढ असून विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन आयडॉलचे संचालक डॉ.प्रकाश महानवर यांनी केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3plqg9W
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या