TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

केंद्रीय विद्यालयांतील सीट्स वाढणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती Rojgar News

Kendriya Vidyalaya: केंद्रीय विद्यालयांच्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे फेटाळण्यात आला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा झाली. केंद्रीय विद्यालयांच्या जागा वाढवण्याचा सध्या कोणताही विचार नाही असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. दरम्यान केंद्रीय विद्यालयाशी संबंधित आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांत देशभरात १२२ नवीन केंद्रीय विद्यालये स्थापन करण्यात आली आहेत. ही एक निरंतर प्रक्रिया आहे. संरक्षण आणि निमलष्करी कर्मचारी, केंद्रीय स्वायत्त संस्था, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) आणि केंद्र सरकारसह बदलीपात्र केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्रीय विद्यालयात प्रवेश दिला जातो.' केंद्रीय विद्यालयाबद्दल.. संघटना (KVS) पूर्वीची केंद्रीय विद्यालय श्रृंखला ही भारतातील केंद्र सरकारच्या शाळांची एक यंत्रणा आहे. याला भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या अंतर्गत भारतात १२४५ केंद्रीय विद्यालये आणि परदेशात तीन शाळा आहेत. ही जगातील सर्वात मोठ्या शाळांच्या साखळींपैकी एक आहे. नवी दिल्ली येथे याचे मुख्यालय आहे. केंद्रीय विद्यालय संघटना, देशभरात पसरलेल्या २५ क्षेत्रीय कार्यालयांच्या (ROs) मदतीने भारतात आणि परदेशातील १२०० हून अधिक केंद्रीय विद्यालयांचे व्यवस्थापन करते. या अंतर्गत सर्व केंद्रीय विद्यालये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न आहेत. ही यंत्रणा १५ डिसेंबर १९६३ रोजी 'सेंट्रल स्कूल' नावाने स्थापन करण्यात आली. नंतर त्याचे नाव बदलून केंद्रीय विद्यालय करण्यात आले. संपूर्ण भारतातील सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये एकसमान अभ्यासक्रम पाळला जातो. केंद्रीय विद्यालय संघटना एक सामान्य अभ्यासक्रम ऑफर करते आणि ते संरक्षण आणि निमलष्करी कर्मचार्‍यांसह केंद्र सरकारच्या बदलीपात्र कर्मचार्‍यांच्या मुलांना शिक्षणाची संधी देते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GcrOtC
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या