Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-12-09T12:43:44Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IIT Bombay Placements 2021: आयआयटी मुंबईतल्या विद्यार्थ्यांना १,२०१ जॉब ऑफर्स Rojgar News

Advertisement
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( IIT ) बॉम्बे येथे प्लेसमेंटची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवार (सहाव्या दिवशी) पर्यंत सुमारे १,२०१ ऑफर स्वीकारल्या गेल्या आहेत आणि आतापर्यंत एकूण २५५ कंपन्यांनी प्लेसमेंट प्रक्रियेत भाग घेतला आहे. प्लेसमेंटच्या सहाव्या दिवसापर्यंत २४० कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकऱ्या ऑफर केल्या आहेत. क्वालकॉमने सर्वाधिक ४०0 ऑफर दिल्या, त्यानंतर सॅमसंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंटेल कॉर्पोरेशनचा क्रमांक लागतो. सहाव्या दिवसापर्यंत आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून सर्वाधिक ऑफर राकुटेन ग्रुपकडून आल्या. या कंपनीने २६ विद्यार्थ्यांना नोकरी ऑफर केली. त्याच वेळी, उबरने IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंतचे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय वेतन पॅकेज २,८७,५५० यूएस डॉलर्स (२० कोटींहून अधिक) देऊ केले. च्या मते, Uber नंतर, Rubrik ने १.२१ लाख यूएस डॉलर्स (९१ लाखांहून अधिक) चे पॅकेज ऑफर केले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनुक्रमे ५१ आणि ६० कंपन्यांनी प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभाग घेतला तर तिसऱ्या दिवशी ५७ कंपन्यांनी विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतले. गुगल, मायक्रोसॉफ्ट, क्वालकॉम, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, एयरबस, बॅन अँड कंपनी यासारख्या कंपन्यांनी डोमेस्टिक सेक्टर मध्ये सर्वाधिक ऑफर्स दिल्या. IIT मुंबईत प्लेसमेंट प्रक्रिया १ डिसेंबर २०२१ रोजी सुरू झाली होती. कोविड -१९ महामारी मुळे सलग दुसऱ्या वर्षी आयआयटीत ऑनलाइन पद्धतीने प्लेसमेंटचे आयोजन होत आहे. यंदा प्री-प्लेसमेंट ऑफरमध्येही तेजी होती. विविध आयआयटींमध्ये सध्या प्लेसमेंट कार्यक्रम सुरू आहे. IIT-गुवाहाटी मध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना २०० ऑफर्स आल्या, IIT मद्रास मध्ये १७६ प्लेसमेंटसह सर्वाधिक ऑफर्स आल्या, IIT रुरकीच्या १३ विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल ऑफर्स मिळाल्या आणि IIT मंडीमध्ये १३७ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आणि सरासरी वेतनही वाढले. आयआयटी खडगपूर दोन ते २.४० कोटी रुपये प्रति वर्ष पॅकेजसह आयआयटी प्लेसमेंटमध्ये टॉपवर होती. या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना एकूण ३५ अंतरराष्ट्रीय ऑफर्स आल्या आहेत. आयआयटी दिल्लीचे सर्वाधिक पॅकेज १ कोटी रुपये ठरले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rO0M7V
Source https://ift.tt/310mqee