Resume आणि CV मध्ये फरक काय? खूप लोकांना हेच कळत नाही, तुम्ही जाणून घ्या Rojgar News

Resume आणि CV मध्ये फरक काय? खूप लोकांना हेच कळत नाही, तुम्ही जाणून घ्या Rojgar News

and : सीव्ही (CV) आणि रेझ्युमे (Resume) हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात. नोकरी मिळविम्यासाठी रेझ्युमे किंवा सीव्हीची आपल्याला गरज लागते. आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल माहितीवर आपण रेझ्युमे किंवा सीव्ही असे सहज लिहून जातो. पण आपल्यापैकी खूप जणांना CV आणि Resume या दोन्हीत खूप फरक ठावूक नसतो. सीव्ही आणि रेझ्युमेचा अर्थ एकच आहे असे अनेकांना वाटते. अनेकदा लोक या गोंधळात पडतात. अशा परिस्थितीत तुम्ही नोकरीसाठी जात असाल तर आधी दोघांमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या. रेझ्युमे हा फ्रेंच भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ 'सारांश' असा होतो. रेझ्युमेचे स्वरूप खूपच लहान असते. तुमची सर्व माहिती सारांशमध्ये असेल. यामध्ये संबंधित क्षेत्रातील तुमचे स्किल्स, पात्रता आणि स्पेशलायझेशन याबद्दल लिहिलेले असते. रेझ्युमे फक्त एक किंवा दोन पानांचा असतो. रेझ्युमेमध्ये नोकरीसाठी लागणारी पात्रता आणि अनुभव लिहिलेला असतो. सोप्या भाषेत, तुमची थोडक्यातील माहिती रेझ्युमेमध्ये लिहिली जाते. तपशीलवार माहितीसाठी सीव्ही (Curriculum Vitae) बनवावा लागतो. ज्यामध्ये तुमच्या माहितीचा प्रत्येक तपशील लिहिलेला असेल. हा शब्द लॅटिन शब्दापासून घेण्यात आला आहे. ज्याचा अर्थ 'कोर्स ऑफ लाइफ' असा होतो. सीव्ही(Curriculum Vitae) मध्ये तुमची प्रत्येक माहिती तपशीलवार दिलेली असते. तुमचा अभ्यास, अनुभव, यश यावर आधारित माहिती योग्य पद्धतीने मांडली जाते. अधिकारी स्तरावरील किंवा अनुभवाच्या नोकऱ्यांसाठी सीव्ही योग्य मानला जातो. जर तुम्ही उच्च पदासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला बायोडाटा नव्हे तर सीव्ही बनवावा लागेल. ज्यामध्ये तुमची सर्व माहिती सहज मिळू शकेल. तुमच्या अनुभवानुसार सीव्ही तीन ते चार पानांचा असू शकतो. सीव्हीमध्ये काय लिहाल? आतापर्यंतच्या सर्व नोकऱ्या आणि पदांबद्दल लिहू शकतो. तुम्ही तुमच्या जीवनातील यशाबद्दल देखील सीव्हीमध्ये लिहू शकता. तुम्ही तुमच्या योगदानाबद्दल देखील लिहू शकता. रेझ्युमे आणि सीव्ही या दोघांबद्दल सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुमच्या थोडक्यातील माहितीला रेझ्युमे असे म्हणतात आणि तुमच्या तपशीलात दिलेल्या माहितीला सीव्ही म्हणतात. ज्यामध्ये तुमच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट कळू शकते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rPMbcb
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "Resume आणि CV मध्ये फरक काय? खूप लोकांना हेच कळत नाही, तुम्ही जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel