
Mhada Recruitment: म्हाडा भरतीची आज होणारी परीक्षा लांबणीवर, जितेंद्र आव्हाडांची माहिती
रविवार, १२ डिसेंबर, २०२१
Comment

2021: म्हाडा भरतीची () आज होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. म्हाडाने याआधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आज (12 डिसेंबर 2021) रोजी ही परीक्षा होणार होती. पण या परीक्षेला मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केली. ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करुन आव्हाड यांनी ही माहिती दिली. तसेच परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. दरम्यान ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. पण परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाने त्यांचा संताप अनावर झाला. म्हाडामध्ये विविध पदांच्या ५६५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या अंतर्गत भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक या रिक्त जागांसाठी परीक्षा घेतली जात आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/mhada-recruitment-2021-exam-postpone-minister-jitendra-aavhad-inform/articleshow/88234779.cms
0 Response to "Mhada Recruitment: म्हाडा भरतीची आज होणारी परीक्षा लांबणीवर, जितेंद्र आव्हाडांची माहिती"
टिप्पणी पोस्ट करा