TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

POSOCO job 2021: पॉवर सिस्टम ऑपरेशन लिमिटेडमध्ये भरती Rojgar News

POSOCO : इंजिनीअरिंग डिप्लोमाधारकांना ( Limited, POSOCO) मध्ये काम करण्याची संधी आहे. पॉवर सिस्टम ऑपरेशन लिमिटेडने प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरती अंतर्गत इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या भरतीअंतर्गत प्रशिक्षणार्थी पदाच्या ६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mhrdnats.gov.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. ३१ डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्या. शैक्षणिक पात्रता प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. जाहीर करण्यात आलेल्या नोटीसनुसार, उमेदवारांकडील डिप्लोमा प्रमाणपत्र दोन वर्षांपेक्षा जुने नसावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे. हा प्रशिक्षणार्थी पदाचा कालावधी एक वर्षाचा असेल. परीक्षा दिल्यानंतर निकालाची वाट पाहणारेही अर्ज करू शकतात. वयोमर्यादा प्रशिक्षणार्थी भरतीसाठी उमेदवाराचे कमाल वय १८ वर्षे असणे गरजेचे आहे. अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या पदासाठी उमेदवारांची गुणवत्ता यादीत निवड केली जाईल. उमेदवारांना डिप्लोमामधील मिळालेल्या गुणांवर आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि उमेदवारांची मुलाखत होणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्ज भरताना चुकीची माहिती दिल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अपात्र उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना उमेदवारांनी सर्वप्रथम एनएटीची अधिकृत वेबसाइट mhrdnats.gov.in वर जा. उमेदवारांना POSOCO वेबसाइटवर जाऊन अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rEQN4O
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या