TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

आरोग्य विभाग भरतीसाठी फेरपरीक्षा घेण्याची मागणी Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सरळसेवा भरतीसाठी फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी राज्य सरकारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी केली आहे. आरोग्य विभागातील भरतीमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप करून, बाह्य संस्थांच्या माध्यमातून ही भरती करू नये. चतुर्थ श्रेणीतील १०० टक्के रिक्त पदे सरकारने सरळसेवा पद्धतीने भरावीत. तसेच गैरप्रकार करणाऱ्या बाह्य संस्थांना काळ्या यादीत टाकावे, असे भाऊसाहेब पठाण यांचे म्हणणे आहे. करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागातील १०० टक्के रिक्त पदे भरण्याचे सरकारचे आदेश आहेत. दरवर्षी तीन टक्के पदे रिक्त होत आहेत. गेल्या सात वर्षात चतुर्थश्रेणी भरतीची प्रक्रिया रोडावली आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील उपलब्ध चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण पडत आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. चतुर्थ श्रेणी संवर्गातील भरतीसाठी २६ सप्टेंबर, २०२१ रोजी निश्चित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलणे, ३१ ऑक्टोबर, २०२१च्या परीक्षेच्या दिवशी पेपर फुटणे, असे प्रकार बाह्य संस्थांकडून झाल्याचा दावा पठाण यांनी केला आहे. संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. बाह्य संस्था यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया न राबविता शासनामार्फतच भरती व्हावी, असे त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lzeffR
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या