TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया त्वरीत सुरु न झाल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा Rojgar News

Medical PG Exam: वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया अजूनही पूर्ण न झाल्याने युवासेनेतर्फे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांना निवेदन देण्यात आले आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर होऊन महिना झाला तरी वैद्यकीय अभ्यासक्रमांची सुरु झाली नाही. त्याचा परिणाम शासकीय रुग्णालयांमधील आरोग्य सेवांवर होत आहे. ही प्रक्रिया राबविण्याबाबत केंद्र सरकारच्या संस्थेकडून सूचना न आल्याचे महाराष्ट्र सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्राच्या या ढिसाळ कारभाराचा फटका राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या ढिसाळ कारभाराचा फटका राज्यतील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थी हिता विरोधत असणारा हा कारभार खपवून घेतला जाणार नाही असा थेट इशारा सहसचिव कल्पेश यादव यांनी दिला आहे. देशभरातील तसेच राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी अन्यथा आम्ही केंद्र सरकारच्या यंत्रणेला घाम फोडणारे आंदोलन करू असा इशारा युवासेनेतर्फे देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या परिणामास पूर्णतः जबाबदार ढिसाळ नियोजन असणारे केंद्र सरकार प्रशासन असेल असेही त्यांनी म्हटले आहे. एमबीबीएस, बीएचएमएस, बीडीएस, बीएएमएस अशा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश 'नीट'च्या गुणांनुसार होतात. 'नीट'चा निकाल साधारण महिन्यापूर्वी जाहीर झाला. आता डिसेंबर महिना उजाळल्यावरही प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होईल, य़ाबाबत विद्यार्थी आणि पालकांना माहिती नाही. त्यामुळे प्रवेशांबाबत त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता असल्याचे कल्पेश यादव म्हणाले. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया देशपातळीवर साधारण एकाच वेळी होतात. त्याबाबत मेडिकल कौन्सेलिंग कमिटीकडून (एमसीसी) राज्यांना आवश्यक सूचना देण्यात येतात. या सूचना अद्याप न मिळाल्याने प्रवेशप्रक्रियेला सुरुवात करता येत नसल्याची माहिती सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यातच इंजिनीअरिंग, कृषी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत पहिली फेरी सुरू आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना प्रवेश मिळेल का, याची चिंता पालकांना सतावत आहे. यापूर्वी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रियेसाठी नोंदणी न केल्यामुळे वैद्यकीय वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यावर साधारण महिनाभर सुरू असते. या प्रवेशप्रक्रियेत नोंदणी, गुणवत्ता यादी, अलॉटमेंट, प्रवेश घेणे असे विविध टप्पे असतात. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवडा येऊन देखील प्रवेशप्रक्रिया सुरू न झाल्याने पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रचंड निराशा आणि तणावाचे वातावरण आहे. याबाबत युवासेनेतर्फे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख एल मांडविया यांना निवेदन देण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lwslPg
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या