Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-12-03T11:43:49Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नोकरीची संधी, ७० हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Advertisement
2021: मुंबई (National Health Mission Mumbai) अंतर्गत पुन्हा एकदा विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत टेक्निकल लीड, प्रोग्रामर, टेस्टर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. टेक्निकल लीड या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे बीई/बीटेक/ एमसीएची पदवी असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवारांना वेब डेव्हलपमेंट टेक्नोलॉजी, जावा, एचटीएमएल, सीएसएस, आरडीबीएमएस यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा सहा वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असावा. तसेच आर्किटेक्चरचे शिक्षण असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. प्रोग्रामर या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे बीई/बीटेक/ एमसीएची पदवी असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवारांना वेब डेव्हलपमेंट टेक्नोलॉजी, जावा, एचटीएमएल, सीएसएस, आरडीबीएमएस यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांना दोन वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. टेस्टर या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बीई/ बीटेक/ एमसीए किंवा बीएससी/एमएससीपर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांकडे वेब डेव्हलपमेंट, जावा, एटीएमएल, सीएसएस, आरडीबीएमएस यांची माहिती असणे आवश्यक आहे. उमेदवारांना सॉफ्टवेअर टेस्टिंगमधील किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, मागासवर्गीय उमेदवारांसाठी जातीचा दाखला, ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्रे दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज अतिरिक्त संचालक, मानसिक आरोग्य कक्ष, मुंबई, सातवा मजला, आरोग्य भवन, सेंट. जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, स्टेट हेल्थ सोसायटी, पीडी मेलो रोड, मुंबई महाराष्ट्र, पिन कोड- ४००००१ या पत्त्यावर पाठवायचा आहे. पदासाठी अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्ज, कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EmIYUT
Source https://ift.tt/310mqee