
Date: पाचवी आणि आठवी अशा दोन्ही वर्गांमधील विद्यार्थ्यांकरिता असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जप्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. २० फेब्रुवारी, २०२२ मध्ये ही परीक्षा होणार आहे. एक ते ३१ डिसेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना हे अर्ज भरता येतील. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती, पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती , शासकीय विद्यानिकेतन प्रवेश, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. १ डिसेंबरपासून हे अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. या परीक्षेत प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा चार विषयांची परीक्षा होईल. सकाळी ११ ते ३ या वेळेत ही परीक्षा होईल. या परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जातील. महाराष्ट्राचे रहिवासी असलेले आणि पाचवी किंवा आठवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी या परीक्षेकरिता पात्र राहतील. एकूण सात माध्यमे आणि सात सेमीमाध्यमे यांच्यात ही परीक्षा देता येईल. याबाबतची संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xUNmIf
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या