Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १५ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-12-15T11:00:54Z
Rojgar

School Reopening: तब्बल पावणे दोन वर्षांनी भरले वर्ग...शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण..

Advertisement
School Reopeing: ठाण्यात आजपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु झाले आहेत. करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने ठाणे महानगर पालिकेकडून आजपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज तब्बल पावणे दोन वर्षानंतर पुन्हा शाळेची घंटा वाजली आहे. यावेळी करोनामुळे घरी बसलेल्या आणि ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. तब्बल पावणे दोन वर्षानंतर आज पहिली ते सातवीचे वर्ग पुन्हा सुरु झाल्याने शाळेतील किलबिलाट पुन्हा एकदा ऐकू आला आहे. ठाण्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय काल ठाणे महानगर पालिकेकडून घेण्यात आला त्यानंतर आज शाळा प्रशासनाने आपल्या विद्यार्थ्यांचे स्वागत जंगी पद्धतीने केले. पहिली ते सातवीचे विद्यार्थी शाळेत येणार म्हणून शाळा प्रशासनाकडून शाळेच्या परिसरात रांगोळीकाढून फुलांची सजावट करून विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव केला आहे. तसेच शाळा प्रशासनाकडून कोरोनाची नियम पालन करत गेटवरच विद्यार्थ्यांचे टेंप्रेचर चेक करून सेनेटराईस करून मगच त्यांना आत सोडले. तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नाताळ सण जवळ येत असल्याने शाळेकडून दोन सँटाक्लॉजच्या वेशभूषा केलेले सँटा आणि बँडबाजाचे आयोजन केले होते. तसेच कोरोना आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करून विद्यार्थ्यांना एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे बसवण्यात आले होते. पहिलीचे विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत येताना रडतात परंतु शाळेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असल्याने कुठलाही विद्यार्थी आज शाळेच्या पहिल्या दिवशी रडला नाही. आज शाळेचा पहिला दिवस असला तरी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठा उत्साह दाखवून शाळेत चांगल्या प्रकारे हजेरी लावल्याचे शाळेच्या विश्वस्त डॉ. हर्षदा लिखिते यांनी सांगितले. तर २० ते २२ महिन्यानंतर शाळा सुरु झाल्या आहेत. खूप छान वाटतय त्यामुळे शाळेचे शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये उस्तुकता आहे. त्यामुळे आम्ही भारतीय संस्कृती प्रमाणे औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केल असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सांगितले. प्राथमिक शाळेचे वर्ग हे मुलांना घडवण्याचे दिवस असतात त्यामुळे शिक्षकांचा प्रभाव मुलांवर मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे त्यांचे ऑनलाईनमुळे सोशल ग्रुमिंग होत नव्हते ते आता विकसित होणार असल्याचे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वैदेही कोळंबकर यांनी सांगितले. आम्हाला मला शाळेत येऊन खूप मज्जा वाटतेय कारण ऑनलाईनपेक्षा शाळेत आम्हाला मित्र मैत्रिणींना, शिक्षक आणि वर्ग प्रत्यक्ष भेटायला आणि बघायला मिळाले त्याचा आनंद वाटत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. १५ डिसेंबर म्हणजेच आजपासून पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून ठाण्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरु होणार आहे. आता पुन्हा एकदा ऑनलाईन वर्ग सोडून खऱ्याखुऱ्या शाळेची मज्जा विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. शाळेचा पहिला तास, मधली सुट्टी, शाळा सुटल्याची अखेरची घंटा आणि राष्ट्रगीत या सगळ्यांचा आवाज शाळेत घुमणार आहे. पुण्यातील शाळा १६ डिसेंबरपासून शहरातील पहिली ते सातवीच्या शाळा उद्या, गुरुवारपासून (१६ डिसेंबर) सुरू होणार आहेत. त्यामुळे लॉकडाउननंतर पहिल्यांदाच या शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग भरतील. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असून, शाळांमध्ये तयारीला वेग आला आहे. करोना प्रतिबंधासाठीचे सर्व उपाय योजूनच हे वर्ग सुरू करता येतील. एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्यास परवानगी असून, दोन बाकांमधील सहा फूट असावे, असे शासकीय आदेशात म्हटले आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी मंगळवारी या संदर्भातील आदेश काढले. या आदेशानुसार पहिली ते सातवीचे वर्ग १६ डिसेंबरपासून सुरू करता येतील. या संदर्भात राज्य सरकारने वेळोवेळी काढलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू करता येतील. शाळा सुरू करण्यापूर्वी वर्गखोल्यांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे; तसेच थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी आदींची उपलब्धता करणेही आवश्यक आहे. खडकी आणि पुणे कँन्टोन्मेंट बोर्डालाही हे आदेश लागू असतील.


source https://maharashtratimes.com/career/career-news/school-reopening-classes-filled-up-after-two-years-an-atmosphere-of-enthusiasm-among-students-and-teachers/articleshow/88294630.cms