ख्रिसमस सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती

ख्रिसमस सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती

School Reopen: करोना (Covid 19) आणि ओमिक्रॉन (Omicron) प्रसारामुळे पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच ख्रिसमस सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचा नव्यावर्षात आज शाळेतील पहिला दिवस (School Reopening) आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे पालक धास्तावले आहेत. याचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर दिसून आला. आज पासून पंधरा ते अठरा वर्षांच्या मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. म्हणजे नववी आणि दहावीच्या मुलांच्या लसीकरणाला () प्राधान्य दिले आहे. यामुळे लसीकरण झाल्यावरच पालक मुलांना शाळेत पाठवण्याची शक्यता आहे. आज बहुतेक शाळेतील उपस्थिती केवळ तीन ते चार टक्के होती असे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेता आँनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे असे मत शिक्षिका सुचिता जगताप यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील निर्बंध दिवसेंदिवस कडक होत चालले आहेत. कोरोना व ओमिक्राँनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रवास करणे धोक्याचे आहे म्हणून शालेय शिक्षण विभागाने तत्काळ योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा द्यावा असे मत विजय महाजन यांनी व्यक्त केले. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई, ठाण्यासह काही सीबीएसई अथवा आयसीएसई शाळांनी पुन्हा शाळा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व माध्यमाच्या शाळा सरकारच्या निर्णयानंतरच आपली भूमिका ठरविणार आहेत. यामुळे आज, सोमवारपासून शहरातील बहुतांश शाळा नियोजित वेळेवर सुरू होणार आहेत. करोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर पालकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पाल्याला शाळेत पाठवायचे की नाही यावरून चर्चा रंगल्या आहेत. यातच काही सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या शाळांनी आज, सोमवारपासून शाळा पुन्हा ऑनलाइन होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र बहुतांश संस्थांनी शाळा दोन्ही पद्धतीने सुरू ठेवण्याचे ठरविले आहे. शाळेने आणि अन्य पालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतल्यास शाळेत पाठविण्यास तयार असल्याचे मत सध्या पाल्याला प्रत्यक्ष शाळेत पाठविणाऱ्या पालकांनी नोंदविले आहे. तर, जे पालक नाताळच्या सुटीनंतर पाल्याला शाळेत पाठवणार होते त्यांनी मात्र थोडे थांबण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रविवारी रात्री उशिरापर्यंत शिक्षण विभागाकडून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.


source https://maharashtratimes.com/career/career-news/school-reopen-short-attendance-of-students-on-the-first-day-of-school-after-the-christmas-break/articleshow/88659490.cms

0 Response to "ख्रिसमस सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel