'डिफॉल्टर' प्राध्यापकांची यादी चक्क कॉलेज गेटवर! खोडसाळ विद्यार्थ्यांनी फोटो केला व्हायरल

'डिफॉल्टर' प्राध्यापकांची यादी चक्क कॉलेज गेटवर! खोडसाळ विद्यार्थ्यांनी फोटो केला व्हायरल

कल्याण : विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला लागला तर त्याचे फलक तयार करुन कॉलेज आपल्या आवारात लावले जातात.तर कधीकधी अटेंडस नसले किव्हा बंक करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादीही बोर्डावर लावली जाते. मात्र कल्याण मधील अग्रवाल कॉलेज मध्ये लावलेला एक फलक सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.जुलै ते नोव्हेंबर कमी लेक्चर घेणाऱ्या कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या सहा प्राध्यापकांची यादी कॉलेजच्या गेटवर लावण्यात आली आहे. हा फलकच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. याबाबत कॉलेजचे जॉईन सेक्रेटरी ओमप्रकाश पांडे यांनी सांगितले की, आमच्या कॉलेजची शैक्षणिक कामगिरी चांगली आहे. विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याची ही टक्केवारी जास्त आहे.प्राध्यापक कमी लेक्चर घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना एक समज देण्यासाठी व त्यांच्या कामगिरीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या नावाचा फलक लावला. त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही. कल्याण पश्चिमेला के. एम. अग्रवाल हे नामांकित कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये जुनिअर आणि पदवीचे विविध शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सहा हजार पाचशे इतकी आहे. या कॉलेजमध्ये जुनिअर आणि सिनिअरला मिळून १२५ प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या १०० आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ऑफलाइन शिक्षण सुरू झाले. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती आणि त्यांच्या शैक्षणिक अनियमितते विषयी विविध नोटिसा कॉलेजकडून काढल्या जातात. त्याच प्रमाणे कॉलेजने ज्युनिअर कॉलेजच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या सहा प्राध्यापकांच्या नावाची यादीच कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ लावली आहे. या प्राध्यापकांनी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान कमी लेक्चर घेतले आहे. हा फलकच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. याबाबत कॉलेज प्राचार्य यांनी सांगितले की, हा आमच्या कॉलेजच्या अंतर्गत विषय आहे. प्राध्यापकांकडून कमी लेक्चर का घेतले याचा खुलासा मागविला आहे. त्यांचे खुलासे त्यांनी आम्हाला सादर केले आहेत. तर कॉलेजचे जॉईन सेक्रेटरी ओमप्रकाश पांडे यांनी सांगितले की, आमच्या कॉलेजची शैक्षणिक कामगिरी चांगली आहे. विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याची ही टक्केवारी जास्त आहे. प्राध्यापक कमी लेक्चर घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना एक समज देण्यासाठी व त्यांच्या कामगिरीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या नावाचा फलक लावला. त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्यांच्या कामात सुधारणा होणे हेच यातून अपेक्षित आहे. तर कमी लेक्चर घेणाऱ्या एका प्राध्यापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. हेही वाचा:


source https://maharashtratimes.com/career/career-news/k-m-agrawal-college-kalyan-displayed-defaulter-professor-list-at-college-gate/articleshow/88684312.cms

0 Response to "'डिफॉल्टर' प्राध्यापकांची यादी चक्क कॉलेज गेटवर! खोडसाळ विद्यार्थ्यांनी फोटो केला व्हायरल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel