TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

शिक्षकांकडून शाळेतूनच ऑनलाइन वर्ग, विद्यार्थ्यांविना भरली शाळा

Online Classes: राज्यातील ओमिक्राँन आणि करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई महानगर पालिका तसेच ठाणे आणि नवी मुंबईतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पहिली ते नववीच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीचे वर्ग ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. फक्त दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येण्याची मुभा ठेवली आहे. परंतु कोरोनाच्या भितीने अनेक शााळांमध्ये विद्यार्थीच न आल्याने आज विद्यार्थीविना शाळा भरली आहे असे चित्र दिसत होते. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आँफलाईन शाळा असल्यामुळे शाळा प्रशासनाला शिक्षकांना शाळेत बोलावण्याशिवाय पर्याय नव्हता. शाळांमधील अनेक शिक्षक वसईसारख्या निवासस्थानातून उपनगरात व मुंबई शहरात येत असतात. शाळांमधील उपस्थिती संदर्भात कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसल्याने शाळेतील शिक्षक संभ्रमित आहे. दहावीच्या वर्गात शिकवणारे शिक्षक हे पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ही शिकवत असतात तर काही शिक्षक केवळ नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात अशावेळी केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना शाळेत बोलवायचे की सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थीत राहण्याचे निर्देश द्यावे? असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. शाळेतील सर्व शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी सूचना देऊन शाळेतूनच आँनलाईन वर्ग घेण्यात आले तर काही ठिकाणी शिक्षकांनी आपल्या निवासस्थानातून वर्ग घेण्याची मुभा देण्यात आली आहे. दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक परीक्षा मंडळाने जाहीर केले आहे. यामुळे अनेक शाळांमध्ये दहावी आणि बारावीच्या पुर्व परीक्षा आयोजित केल्या जात आहेत. पण या परीक्षेत प्रत्यक्ष विद्यार्थी किती उपस्थीत राहतील? या संदर्भात शिक्षक वर्ग साशंक आहेत. आँनलाईन पध्दतीने परीक्षा घेतली तर मुल्यमापन व त्यांच्या सत्यतेबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो असे काही शिक्षकांचे म्हणमे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा या आँफलाईन पध्दतीनेच घेण्यात येणार आहेत कारण आँनलाईन परीक्षा घेण्याइणकी सक्षम यंत्रणा नसल्याचेही सांगण्यात येत आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षक, विद्यार्थी पालकांसोबत शिक्षण विभाग आणि प्रशासनही चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/school-reopening-online-classes-from-school-to-teacher-school-full-of-students/articleshow/88681058.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या