TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

NEET MDS २०२२ च्या नोंदणीला आजपासून सुरुवात, 'येथे' करा अर्ज

NEET MDS 2022: राज्यातील महाविद्यालयांमध्ये राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षातर्फे आजपासून नीट एमडीएस २०२२ () प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु होत आहे. या परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स ( National Board Examination, NBE) द्वारे घेतल्या जात आहेत. बोर्डाने जाहीर केलेल्या नीट एमडीएस (NEET MDS) नोटिफिकेशननुसार, अर्जाचा फॉर्म दुपारी ३ च्या सुमारास उपलब्ध करून दिला जाईल. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जाऊन परीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. नीट एमडीएस २०२२ (NEET MDS 2022) परीक्षा ६ मार्च २०२२ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. उमेदवारांकडे अर्ज भरण्यासाठी साधारण २० दिवस आहेत. त्यांना २४ जानेवारी २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. असा करा अर्ज नीट एमडीएस नोंदणीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जा. होमपेजवर 'NEET MDS'टॅबवर क्लिक करा आणि नंतर '२०२२' विभागावर क्लिक करा. (थेट लिंक लवकरच सक्रिय होईल) एक नवीन पेज खुले होईल. इथे सर्व तपशील भरुन नोंदणी करा. अर्ज भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा. अर्ज शुल्क भरा आणि सबमिटवर क्लिक करा. भविष्यातील उपयोगासाठी नोंदणी फॉर्मची एक प्रिंट डाउनलोड करा. नीट एमडीएस २०२२ चा अर्ज नोंदणी शुल्क भरल्याशिवाय स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्या. उमेदवारांना अर्जासंदर्भात काही प्रश्न असल्यास ते NBE शी ०२२ - ६१०८७५९५ वर संपर्क साधू शकतात. नीट एमडीएस २०२२ परीक्षा ६ मार्च २०२२ आहे. अधिकृत वेबसाइटवर परीक्षेच्या संदर्भात अधिक तपशील देण्यात आला आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS)तर्फे ६ मार्च २०२२ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉम्प्युटर आधारित NEET-MDS 2022 परीक्षा घेईल असे NBEMS च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-mds-2022-registration-for-neet-mds-begins-today-know-how-to-apply/articleshow/88681801.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या