TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

ESIC Recruitment 2022: नोकरीची संधी! ८० हजारांहून अधिक पगार, दहावी-बारावी पास करू शकतात अर्ज

ESIC Recruitment 2022: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), स्टेनोग्राफर (स्टेनो) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) च्या ३८०० हून अधिक रिक्त जागा भरल्या जणार आहेत.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल आणि १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत चालेल. या भरतीची अधिसूचना २८ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाली आहे. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. भरतीशी संबंधित अपडेट्स मिळविण्यासाठी वेबसाइटवर लक्ष ठेवा.

(हे ही वाचा: SBI Recruitment 2022: सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी, ‘असा’ करा अर्ज)

पदांचा तपशील

या भरती प्रक्रियेअंतर्गत अप्पर डिव्हिजन लिपिकाची १७२६ पदे, स्टेनोग्राफरची १६३ पदे, मल्टी टास्किंग स्टाफची १९३ पदे भरण्यात येणार आहेत. अशी एकूण रिक्त पदांची संख्या ३८४७ आहे.

वायोमार्यदा किती?

यूडीसी आणि स्टेनो पदासाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे आहे. मल्टी टास्किंग स्टाफसाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे आहे. वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रताही वेगळी आहे. तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना वाचा.

पगार किती?

यूडीसी आणि स्टेनोसाठी वेतन स्तर ४ अंतर्गत, पगार रु. २५,५०० ते रु. ८१,१०० पर्यंत असेल. तर मल्टी टास्किंग स्टाफसाठी स्तर १ अंतर्गत पगार रु. १८,००० ते रु. ५६,९०० पर्यंत असेल.

The post ESIC Recruitment 2022: नोकरीची संधी! ८० हजारांहून अधिक पगार, दहावी-बारावी पास करू शकतात अर्ज appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: ESIC Recruitment 2022: नोकरीची संधी! ८० हजारांहून अधिक पगार, दहावी-बारावी पास करू शकतात अर्जhttps://ift.tt/3dmx3ZV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या