Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी ०१, २०२२ WIB
Last Updated 2022-02-01T08:00:38Z
Rojgar

ऑनलाइन शिक्षण त्यावेळची गरज होती- उदय सामंत

Advertisement
Online education: राज्यासह देशातील करोना आणि ओमिक्रॉनची रुग्णसंख्या कमी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयांचे ऑफलाइन वर्ग आजपासून सुरु होत आहेत. त्यामुळे यापुढे होणाऱ्या सर्व महाविद्यालयीन परीक्षा देखील ऑफलाइन माध्यमातून होण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. करोना काळातील गरज होती. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याने ऑफलाइन वर्ग सुरु होतील. तसेच परीक्षा देखील ऑफलाइन माध्यमातून होतील अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घ्याव्या या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केल्याचे पाहायला मिळाले. नेत्यांच्या मिटींग ऑनलाइन माध्यमातून होत असताना विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा का द्यायला सांगता? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. परीक्षेला बसणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ लाखांपेक्षा जास्त आहे. या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा होईल अशी व्यवस्था उपलब्ध नाही. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्याने ऑनलाइन परीक्षा अशक्य असल्याचे शिक्षणतज्ञांचे म्हणणे आहे. आंदोलनकर्त्यांनी परीक्षांबाबत ठोस पर्याय सुचवावा, असा टोलाही शिक्षण अभ्यासकांकडून लगावण्यात येत आहे. तसेच परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने आणि ठरलेल्या वेळेतच होणार, अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. राज्यातील कॉलेजांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाइन सुरू झाले आहेत. मात्र, करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश दिला जात आहे. आता रुग्णसंख्या घटू लागल्याने शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरणही पूर्ण होऊ लागले आहे. यामुळे १ फेब्रुवारीपासून कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी दोन लसमात्रा पूर्ण केल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनाच कॉलेजांत तसेच विद्यापीठात प्रवेश दिला जात आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/online-education-was-the-need-of-the-corona-pandemic-says-education-minister-uday-samant/articleshow/89264705.cms