TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CBSE Term 1 Results: दहावी, बारावी निकालापूर्वी वेबसाइट क्रॅश, अर्धा तास ठप्प

CBSE Term 1 : आयसीएसई आणि आयएससी सेमिस्टर १ चे निकाल ने जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सीबीएसई टर्म १ परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे. पण अधिकृत अपडेट येण्यापूर्वीच सीबीएसईची वेबसाइट www.cbse.gov.in आणि cbseresults.nic.in क्रॅश झाली. साधारण अर्ध्या तासानंतर टेक्निकल टीमने रिकव्हर केले आणि वेबसाइट पूर्ववत झाली. वेबसाईट क्रॅश झाल्यापासून चर्चेला उधाण आले. सीबीएसई दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, सीबीएसईने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण निकालाची चर्चा होण्याचे आणखी एक कारण म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सीबीएसईच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, दहावी आणि बारावीच्या टर्म १ बोर्डाच्या परीक्षांचे निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर केले जातील. आता आठवडा संपला आहे. त्यामुळे सीबीएसई दहावी आणि बारावी टर्म १ बोर्ड परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/cbse-term-1-results-cbse-website-crashed-before-10th-12th-term-1-result-stalled-for-half-an-hour/articleshow/89400822.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या