Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी ०८, २०२२ WIB
Last Updated 2022-02-07T19:46:05Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

NEET Exam : नीट परीक्षा : इंटर्नशीप डेडलाईनबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी Rojgar News

Advertisement
Supreme Court

नवी दिल्ली : नीट पीजी-2022 (NEET PG 2022) अर्थात राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणार्‍या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)त मंगळवारी पुन्हा सुनावणी करणार आहे. न्यायालयाने सोमवारी या सुनावणीबाबत जाहीर केले. या परीक्षेसंबंधी इंटर्नशीपच्या डेडलाईनबाबत सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सुनावणी करणार आहे. एमबीबीएसच्या सहा विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या विद्यार्थ्यांनी 12 मार्च रोजी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. (Supreme Court hearing on NEET exam internship deadline on Tuesday)

विशेष म्हणजे, त्या याचिकेवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीसीने ही नीट परीक्षा 6-8 आठवड्यांसाठी म्हणजेच जवळपास दोन महिने पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरातील नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. याचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सरकारच्या निर्णयानुसार ही परीक्षा आता 21 मे 2022 रोजी होणार आहे.

सुधारित वेळापत्रकाची द्विसदस्यीय खंडपीठाकडून दखल

सरकारने जाहीर केलेल्या नीट परीक्षेच्या सुधारित वेळापत्रकाची न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने दखल घेतली आहे. वैद्यकीय समुपदेशन समितीने नीट पीजी परीक्षा 6 ते 8 आठवड्यांसाठी पुढे ढकलली असल्याचे खंडपीठाने नमूद केले. याचवेळी इंटर्नशिप डेडलाईनबाबत मंगळवारी सुनावणी करण्यास खंडपीठ तयार झाले आहे. याचिका दाखल केलेल्या सहा विद्यार्थ्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी न्यायालयात बाजू मांडली आहे. नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी काही मुद्दे अजूनही सोडवायचे आहेत. मुख्य समस्या 21 मेच्या अंतिम मुदतीशी संबंधित आहे, जी एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. डॉक्टर कोविड ड्युटीमध्ये गुंतले होते. त्यामुळे त्यांना इंटर्नशीपचा कालावधी पूर्ण करणे कठीण बनले होते, असे म्हणणे शंकरनारायणन यांनी मांडले. त्याची दखल घेत न्यायालयाने याबाबत मंगळवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. (Supreme Court hearing on NEET exam internship deadline on Tuesday)

इतर बातम्या

Supreme Court : ‘कोविन’वरील नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात, आता काँग्रेसनं कोरोना काळात केलेल्या मदतकार्याची यादीच दिली


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: NEET Exam : नीट परीक्षा : इंटर्नशीप डेडलाईनबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणीhttps://ift.tt/m8bzoiy