TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Ramadan Eid 2023 : भारतात रमजान ईद कधी साजरी होणार? ईद-उल-फित्रचे महत्त्व जाणून घ्या

Ramadan Eid 2023 : मुस्लीम बांधवांमध्ये रमजान ईद <a href="https://ift.tt/4tDp36A Eid 2023) हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. याला ईद-उल्-सगीर तसेच ईद उल् फित्र असेही म्हटले जाते असेही म्हटले जाते. हिजरी कालगणनेनुसार नवव्या रमजान महिन्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास केले जातात. यालाच रोजा असे म्हणतात. रमजान महिन्यात, 29 ते 30 दिवस उपवास ठेवला जातो, त्यानंतर ईदचा सण साजरा केला जातो यालाच ईद-उल-फित्र असेही म्हणतात. ईदची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो. ज्याप्रमाणे रमजानचा महिना चंद्रदर्शनानंतर सुरू होतो, त्याचप्रमाणे रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद साजरी केली जाते. इस्लामिक कॅलेंडरनुसार, ईदचा सण हा शव्वालच्या पहिल्या तारखेला साजरा केला जातो, त्यामुळे देशात ईद कधी साजरी केली जाईल हे जाणून घेऊयात.

रमजान ईद मुस्लीम धर्मींयांचा सर्वात मोठा सण म्हणूनही ओळखला जातो. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव नवीन कपडे परिधान करून मशिदीत जातात. नमाज पडतात. एकमेकांना शुभेच्छाही देतात. तसेच, या दिवशी घरोघरी शिरखुर्मासारखे गोड पदार्थ बनवले जातात.

22 किंवा 23 एप्रिल रोजी ईद नेमकी कधी आहे ?

21 एप्रिलला चंद्र दिसला तर ईद 22 एप्रिलला असेल. अन्यथा 30 दिवस उपवास पूर्ण करून 23 एप्रिलला ईद साजरी केली जाईल. त्यानुसार भारतात 21 एप्रिलला चंद्रदर्शन झाल्यास 29 दिवस उपवास करून 22 एप्रिलला ईद साजरी केली जाईल. अन्यथा, 30 दिवस उपवास करून 23 एप्रिलला ईद साजरी केली जाईल.

भारतात 22 एप्रिलला ईद होण्याची शक्यता

इस्लामिक कॅलेंडर 29 किंवा 30 दिवसांचे आहे आणि 2021 आणि 2022 मध्ये रमजान महिना इस्लामिक कॅलेंडरनुसार 30 दिवसांचा होता. अशा स्थितीत वर्ष-दर-वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, जर रमजान एका वर्षात 30 दिवसांचा असेल तर पुढच्या वर्षी 29 दिवसांचा असेल. अशा परिस्थितीत या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये रमजान 29 दिवसांचा असेल आणि 22 एप्रिलला देशात ईद साजरी होण्याची शक्यता आहे.

ईस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या मक्का या शहरात आज शुक्रवार 21 एप्रिल रोजी रमजान ईद साजरी होत आहे. साधारण मक्का ईद साजरी झाल्यानंतर भारतात दुसऱ्या दिवशी भारतात ईद साजरी होते त्यानुसार भारतात 22 एप्रिल रोजी ईद साजरी होण्याची शक्यता आहे.

रमजान महिन्याचं महत्त्व

इस्लाम धर्मात रमजान महिन्याला मोठे महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लीम बांधव उपवास करत असतात. याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असे म्हटले जाते. एक महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या महिन्यात इस्लामने दानधर्माचे प्रंचड महत्व सांगितले आहे. रमजान महिन्यातच इस्लामचे पवित्र ग्रंथ असलेले कुरान अवतरित झाले, अशी मुस्लीम बांधवांची श्रद्धा आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/MyOcNVI Days in April 2023 : 'एप्रिल फूल डे', 'अक्षय्य तृतीया', 'रमजान ईद'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ramadan Eid 2023 : भारतात रमजान ईद कधी साजरी होणार? ईद-उल-फित्रचे महत्त्व जाणून घ्याhttps://ift.tt/L8z76qR

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या